Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व प्रश्नाची चर्चा या आठवड्यात व्हावी अशी अपेक्षा विरोधी पक्ष नेते म्हणुन सत्ताधाऱ्यांना आहे – सचिन अहिर  

नागपूर प्रतिनिधी - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत, वरून सरदेसाई, मिलिंद नार्वेकर सोबत. अधिवेशनाला सर्वा

EXCLUSIVE: पद्मश्री पोपटराव पवार यांचे जनतेला आव्हान ; मुख्यमंत्र्यांना पत्र | LokNews24
भारतात मुस्लिमांची स्थिती खूप चांगली : अर्थमंत्री सीतारामन
कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी.

नागपूर प्रतिनिधी – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत, वरून सरदेसाई, मिलिंद नार्वेकर सोबत. अधिवेशनाला सर्वाना उपस्थित राहावे हे अपेक्षित आहे. यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आले आहेत. संसदेच्या सेशन एक आठवडा स्थगित असल्यानं खासदार संजय राऊत हे सोबत आले आहे. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, वरून सरदेसाई हे सर्व एका विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले आहे.  यात उद्या शिवसेनेचे सर्व नेते आले असून विदर्भातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेणार आहे. पण सगळे एकत्र आल्याने काहींनी धसका घेतला आहे.मागील आठवड्यात आम्ही विरोधक म्हणून विदर्भाचे प्रश्न आम्ही उचलण्याचा प्रयत्न करत असताना सत्ताधारी त्या प्रश्नावर बोलू देत नाही असाही आरोप सचिन अहिर यांनी केला.  या सगळ्या प्रश्नाचे दखल उद्या घेतली जाणार आहे. सभागृहात उद्या 298 अंतर्गत विरोधी पक्ष नेते तसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विषय मांडणार आहे. तसेच कर्नाटक प्रश्नावर सुद्धा विधान परिषदेत उचलून धरणार आहे. या सगळ्या प्रश्नांची चर्चा सभागृहात व्हावी एवढी अपेक्षा विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्याकडून असल्याचं सचिन अहिर म्हणालेत.

COMMENTS