Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यलम प्रिमिअर क्रिकेट स्पर्धेत लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स अजिंक्य

लातूर प्रतिनिधी - पुण्याच्या धर्तीवर येथे आयोजित यलम प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेत लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स संघ अजिंक्य ठरला आहे. या संघाने अंतिम

पंढरपूर शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा
स्वीस महिला अभ्यास मंडळाची ‘ ध्रुव’ भेट ; सर्जनशील अभ्यास पद्धतीचे कौतुक
तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी

लातूर प्रतिनिधी – पुण्याच्या धर्तीवर येथे आयोजित यलम प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेत लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स संघ अजिंक्य ठरला आहे. या संघाने अंतिम सामन्यात डीजी वॉरिअर्स संघाचा 21 धावाने पराभव करीत पहिल्या वर्षी आयोजित या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. येथील दयानंद संस्थेच्या स्टेडिअमवर ता. सात ते नऊ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले यांचा लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स, बालाजी मुस्कावाड यांचा बालाजी स्टार, डॉ. दत्ता गोजमगुंडे यांचा डीजी वॉरिअर्स, विशाल गोजमगुंडे यांचा राजमुद्रा, सचिन पडिले यांचा एसपी जायन्टस, रिंवद्र चामले यांचा पद्मविपीन लिजेंटस, अनुप शेळके यांचा वाडा वॉरिअर्स, राज बरुरे यांचा वन अ‍ॅण्ड ओनली हे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी प्रा. शिवराज मोटेगावकर हे प्रायोजक होते. तर अ‍ॅड. तुकाराम व्यंजने, राजकुमार गोजमगुंडे हे सहप्रायोजक होते. या स्पर्धेतील अंतिम सामना लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स संघ व डीजी वॉरिअर्स संघा दरम्यान झाला. नाणेफेक जिंकून डीजी वॉरिअर्सने गोलंदाजी घेतली. यात लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स संघाने दहा षटकात 119 धावा काढल्या. यात अमर बदामे यांनी 60, जगन्नाथ गड्डीमे 20, हेमंत जानवळकर यांनी 20 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या डीजी वॉरिअर्सचा संघ 98 धावात सर्वबाद झाला. 21 धावांनी मात करीत लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स संघाने पहिल्यांदाच आयोजित या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेकरीता श्रीनिवास शेळके, गणेश कोमटवाड, संतोष कुल्ले, श्रीपाल गोजमगुंडे, पंकज शेळके, परमेश्वर बडगीरे, सचिन कोल्हे यांनी पुढाकार घेतला.

COMMENTS