पुणे ः आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पाच लाख रुपयांची लाच मागून एकाकडून तडजोडीत 40 हजार रुपयांची लाच घेणार्या पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस उपन

पुणे ः आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पाच लाख रुपयांची लाच मागून एकाकडून तडजोडीत 40 हजार रुपयांची लाच घेणार्या पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकासह वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून सोमवारी रात्री अटक केली. एरंडवणे भागातील अलंकार पोलिस ठाण्याच्या आवारात सदरची कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण (वय 35, रा. शासकीय पोलिस वसाहत, परमारनगर, वानवडी,पुणे), अॅड. राहुल जयसिंग फुलसुंदर (वय 31, रा. चित्रदुर्ग अपार्टमेंट, कोथरुड, पुणे) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या भावाविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक न करणे, तसेच तपासात सह्याय करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांनी पाच लाख रुपयांची लाच तक्रारदार मागितली होती. तक्रारदार तरुणाने तडजोडीत पहिला हप्ता म्हणून 40 हजार रुपये देण्याचे मान्य करून तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलंकार पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावून चव्हाण यांच्यासाठी लाच घेणारे वकील अॅड.फुलसुंदर यांना पकडले. चौकशीत चव्हाण यांच्यासाठी लाच घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलिस शिपाई तावरे, डावखर, कदम यांनी ही कारवाई केली आहे.
COMMENTS