Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथे सरस्वती महा विद्यालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न

विद्यार्थ्यांनी कायदयाचे पालन करावे-न्यायाधीश श्रीमती एस.व्ही.पावसकर

केज प्रतिनिधी- केज शहरातील सरस्वती महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती केज व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीर दिनां

माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य
अहमदपुरात भाजपची सवाद्य दुचाकी रॅली
बांधकाम मजुराचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

केज प्रतिनिधी- केज शहरातील सरस्वती महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती केज व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीर दिनांक 12 आगष्ट 2023 रोजी शनीवारी घेण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक केज दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस. व्ही.पावसकर,तिसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री. ए.टी.जगताप,केज वकील संघाचे अध्यक्ष श्री.एम. एस.लाड,सहायक गट विकास अधिकारी श्रीमती सविता शेप,पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील, गट शिक्षणाधिकारी कमलाकर खरात,विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, प्राचार्य डॉ.जी.बी.पाटील, डॉ.हनुमंत सौदागर, मुख्याध्यापक धनराज सोनवणे,मुख्याध्यापक सविता घुले,सहाय्यक सरकारी वकील ड.डी. आर.घुले,ड.डी.टी. सपाटे,ड.एल.व्ही. गायकवाड,ड.एस.व्ही. मिसळे आदी मान्यवर उपस्थीत होते.यावेळी मार्गदर्शन करताना अड.एम.एस. लाड म्हणाले की,विद्यार्थ्यांनी व्यसन करू नये.अभ्यास करून चांगले यश प्राप्त करावे उपलब्ध सोयी सुविधांचा योग्य वापर करून योग्य दिशेने वाटचाल करावी असे मत व्यक्तकेले.अड.गायकवाड यांनी युवकांनी योग्य संधीचा उपयोग करून घ्यावा असे मत व्यक्त केले.श्री.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी गाड्या चालवत असताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे मत व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती एस.व्ही.पावसकर प्रमुख दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज यानी रगिंग कायद्याबाबत उपस्थितांना माहिती दिली.त्या म्हणाल्या की,महाविद्यालयात रगिंगचे प्रमाण 40 टक्के असून प्रत्येक महाविद्या लयात रगिंगची तपासणी करण्यासाठी एक कमिटी नेमलेली आहे.मात्र तीची टक्केवारी पाहता या कमिटीकडे 1 टक्केच तक्रार केल्याची नोंद आहे. कायद्याच्या कलम 5 नुसार अपराध करणा-या ला अपराध सिध्दतेनंतर शैक्षणिक संस्थेतून काढुन टाकण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच संस्थेतून काढून टाकल्यानंतर विद्यार्थ्यास पाच वर्षांपर्यंत कुठल्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश देण्यात येणार नाही.तसेच विदयार्थ्यांचा छळ करू नये.विदयार्थ्यांनी विदयार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण न करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी,प्राध्यापकासह 120 लाभार्थी उपस्थित होते.यावेळी न्यायिक अधिकारी व वकील संघाच्या सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना माहितीपत्रक देण्यात आले.श्री सुसंगेसर व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक ड.डी.टी. सपाटे यांनी केले.तर सूत्रसंचालन ड.एस.व्ही. मिसळे यांनी तर आभार डॉ.नागेश कराळे यांनी मानले.या कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे आयक्यू सी समन्वयक प्रा.डॉ. वैशाली आहेर,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. किरणकुमार धीमधीमे व वकील संघ यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS