Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण रद्द

मुंबई/प्रतिनिधी ः कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे शनिवारी (3 जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आह

गाडीचा ब्रिकफेल झाल्याने संरक्षण भिंत तोडून बस शिरली इमारतीत 
बारा वर्षीय मुलाने केली एका २६ वर्षीय युवकाची हत्या
नॉन क्रिमिलेयरची मर्यादा आता 15 लाख

मुंबई/प्रतिनिधी ः कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे शनिवारी (3 जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. तर रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मडगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहणार होते. पण ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण रद्द करण्यात आले आहे. ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचे सध्या प्लॅनिंग आहे.

COMMENTS