Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणंदच्या शिवम बाल रुग्णालयात सीएसडी जनरल बिपीन रावत योजनेचा शुभारंभ

लोणंद : शिवम बाल रुग्णालयात सीएसडी जनरल बिपीन रावत योजनेचा शुभारंभ करताना मान्यवर. (छाया : सुशिल गायकवाड) सैनिकांच्या बालकांसाठी मोफत ओपीडी तपासणी

हुमगाव-बावधन प्रलंबित रस्त्यासाठी चाळीस गाव एकवटले
तासगांव राजापुर राज्य मार्गावर पावलेवाडीत वाहनांसह वाहनधारकांची कोंडी; ठेकेदारांचे कामाचे नियोजन नसल्याने वाहन धारकांना नाहक त्रास
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ

सैनिकांच्या बालकांसाठी मोफत ओपीडी तपासणी : डॉ. मनोज निकम
लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील शिवम बालरूग्णालयामध्ये प्रजासत्ताक दिनी सीएसडी जनरल बिपीन रावत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून सैन्य दलात कार्यरत असणार्‍या वडील बालकांची सेवेमध्ये असेपर्यंत ओपीडीमध्ये मोफत तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. आजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी शिवम बालरूग्णालय लोणंद येथे येऊन नोंदणी करण्याचे आहे. जेणेकरून त्या बालकास याचा लाभ मिळेल. ही योजना आपल्या देशातील सर्व जवानांच्या मुलांसाठी खुली आहे, अशी माहिती शिवम बाल रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मनोज निकम यांनी दिली.
या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे खंडाळा तालुकाध्यक्ष मस्कु अण्णा शेळके प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करून योजनेच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश दाणी, सैनिक गणेश धायगुडे, नगरसेविका दीपाली शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नगरसेवक शिवाजीराव शेळके, माजी नगरसेवक हणमंतराव शेळके, नवनिर्वाचित नगरसेविका तृप्ती घाडगे व दीपाली शेळके यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर्स आजी-माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अर्चना निकम यांनी केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS