लातूर प्रतिनिधी - लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या मागणीमुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंत
लातूर प्रतिनिधी – लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या मागणीमुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंतर्गत लातूर, रेणापूर आणि औसा तालुक्यातील 32 रस्त्यांसाठी तब्बल 5 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे लवकरच या रस्त्यांचे चित्र पालटणार आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी व मजबुतीकरणासाठी आमदार धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेवून हा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा ते सांगवी 0 ते 400 मी. डांबरीकरण व मजबुतीकरण करणे, इंदरठाणा ते अजरखेडा 400 ते 800 मी. डांबरीकरण व मजबुतीकरण करणे, खरोळा ते कुंभारवाडी 0/00ते 4/500 डांबरीकरण व मजबुतीकरण करणे, इंदरठाणा ते आजरखेडा ग्रामा 78 0/0 ते 2/00 रस्ता करणे, ग्रामा97 पानगाव ते नरवटवाडी किमी 3/200 ते 4/00 रस्ता सुधारणा करणे, सारोळा ते खलंग्री 0/800 ते 2/00 ग्रामा 96 रस्ता सुधारणा करणे, मुरढव ते तळणी ग्रामा 55 किमी 0/00 ते 1/00 मजबुतीकरण करणे, गरसुळी ते कामखेडा रस्ता 0/00 ते 2/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, वाला ते तत्तापूर रस्ता 0/00 ते 2/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, वाला ते गरसुळी रस्ता 0/00 ते 2/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, चाडगाव ते जिल्हा सरहद्द 0/00 ते 2/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, मोरवड ते नांदगाव रस्ता 0/00 ते 2/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, मोरवड ते टक्केवाडी ते जिल्हा सरहद्द रस्ता 2/00 ते 4/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम, फरदपूर ते गरसुळी 0/00 ते 2/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम यासाठी निधी मंजूर झाला आहे.लातूर तालुक्यातील नागझरी ते रायवाडी रस्ता डांबरीकरण व मजबुतीकर, प्रजिमा 5 काटगाव ग्रामा 21 टाकळी फाटा 0/0 ते 1/500 रस्ता सुधारणा करणे, मढी मंदिर रस्ता सुधारणा करणे ग्रामा23 1/00 ते 2/00, भोसा ते मसला ग्रामा 48 सिमेंट रस्ता करणे, खंडापूर तेचिंचोलीराववाडी मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मांजरी ते गातेगाव रस्ता पुलाचे काम करणे, बोरी ते सावरगाव रस्ता पुल दुरूस्ती व पोहोच रस्ता ग्रामा148 0/00 ते 1/00, तांदूळजा ते सारसा रस्ता 0/550 ते 1/550 रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, गाधवड ते भिसेवाघोली रस्ता 0/550 ते 1/550 रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, चिखूर्डा ते मुरूड अकोला रस्ता 1/00 ते 2/00 रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, रामेगाव ते गातेगाव रस्ता 1/00 ते 2/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, बोरी ते सुगाव रस्ता पुल दुरूस्ती करणे व पोहोच रस्ता 1/00 ते 2/00 करणे, भातांगळी ते भाडगाव 2/00 ते 3/00 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, सोनवती ते भातखेडा रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, धनेगाव सोनवती रस्ता ते बाभळगाव 0/00 ते 0/300 पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे, भाडगाव ते मुरंबी पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे तर औसा तालुक्यातील ग्रामा 10 लखनगाव ते हळदुर्ग रामा 239 पर्यंत रस्ता सुधारणा करणे. 0/00 ते 1/00 औसाभेटा ते अंदोरा 0/0 ते 400 ग्रामा 4 रस्ता सुधारणा करणे ही कामे या निधीतून केली जाणार आहेत.
COMMENTS