Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा-महाविध्यालयांतून मुलींना लाठीकाठी प्रशिक्षण

‘कमवा आणि शिका’ योजनेतून दरमहा दोन हजार रुपये : मंत्री चंद्रकांतदादा पाटलांची घोषणा सांगली : मुलींच्या स्वसंरक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालया

चंद्रकांतदादांच्या मनातली खदखद
भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)
जि.प.मध्येही भाजपचा बिनविरोधचा पॅटर्न

‘कमवा आणि शिका’ योजनेतून दरमहा दोन हजार रुपये : मंत्री चंद्रकांतदादा पाटलांची घोषणा

सांगली : मुलींच्या स्वसंरक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लाठीकाठीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच राज्यातील महाविद्यालयांत शिक्षण घेणार्‍या मुलींना शिक्षण व वसतिगृह शुल्कमुक्त सुविधा देत ‘कमवा आणि शिका’ योजनेतून दरमहा दोन हजार रुपये देण्याचीही घोषणा त्यांनी केली.
सांगली येथे आयोजित मुली व महिला सक्षमीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. महिला सबलीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सांगली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांतर्गत पन्नास शाळांमधील सुमारे छत्तीस हजार मुलींना दर आठवड्याला एक तास स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. यात कराटे आणि ज्युडोचे धडे देण्यात आले असून त्यापैकी पंधरा हजार चारशे मुलींना प्रथम स्तराचा ‘पिवळा पट्टा’ देण्यात आला आहे. पुढील स्तरासाठी लागणारा खर्च प्रशासनाकडून उचलला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. याशिवाय जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत लाठीकाठीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे हजार मुलींना प्रमाणपत्रे आणि पिवळा पट्टा प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी मुलींना दिले जात असलेले स्वसंरक्षण प्रशिक्षण पाहून समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे मुली आत्मविश्‍वासाने पुढे जातील आणि पालकांचीही चिंता कमी होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात त्यांच्या हलक्याफुलक्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये क्षणभर हशाही पिकला. कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 51 शाळामधील 38 हजार 600 विद्यार्थिनींना मोफत कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण देण्यात आले. गत आठवड्यात त्यातील 15 हजार 508 विद्यार्थिनींनी परीक्षेत पास होऊन यलो बेल्ट मिळवला.

उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी मुलींना 100 टक्के शुल्क माफी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुलींना शिक्षणातून सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, त्या दृष्टीने अनेक योजना राबवण्यात येत आहेत. मुलींना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफी निर्णयामुळे तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या गत वर्षी 28 हजार व या वर्षी 44 हजारांनी वाढली. याचबरोबर मुलींना निर्वाह भत्ताही दिला जातो. आगामी काळात इतर शुल्कही मोफत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, मुलींसाठी कमवा व शिका ही योजना लवकरच राबवण्यात येईल. या योजनेतून प्रतितास 60 रूपये प्रमाणे मुलींना महिन्याला 2 हजार रूपये मिळतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS