Homeताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई प्रतिनिधी - लता मंगेशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या वर्षी लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सुरु केला आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार पंत

मुळा उजव्या कालव्याची जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पहाणी
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
महाराष्ट्राला ऊर्जाक्षेत्रासाठी ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ प्रदान

मुंबई प्रतिनिधी – लता मंगेशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या वर्षी लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सुरु केला आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला होता. 2023 चा लता दिनानाथ मंगेशकर हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. अलिकडेच त्यांना 2021 ला जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. याबरोबरच, लता दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार हा अभिनेता प्रसाद ओकला जाहीर झाला आहे. उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी 2022 ला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला होता. पुरस्कार प्रदान सोहळा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी सोमवारी 24 एप्रिलला माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. यासोबतच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार भारतीय संगीत क्षेत्रासाठी पंकज उधास यांना, वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या गौरी थिएटर्सला आणि समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सद्‍गुरू सेवा संघ ट्रस्ट यांना जाहीर करण्यात आला आहे.

COMMENTS