Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवान विशाल पवार यांना अखेरचा निरोप

वाठार स्टेशन / वार्ताहर : वाठार स्टेशन येथील जवान विशाल विश्‍वास पवार (वय 32) यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले.ते

मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर शेलारांचा गंभीर आरोप
कराडचा सिध्दांत सिंहासने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशात 17 वा
माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील यांचे निधन

वाठार स्टेशन / वार्ताहर : वाठार स्टेशन येथील जवान विशाल विश्‍वास पवार (वय 32) यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले.
ते जम्मू काश्मिर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी 16 मराठा लाईट इनफंट्री येथे हवालदार म्हणून देश सेवा बजावत होते. एक वर्षा पूर्वी त्यांना सेवा बजावत असताना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उदमपूर येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटल हलविण्यात आले. तीन महिन्यापासून त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. काल दुपारी 4:30 वाजता त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.
14 वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांनी आसाम, ग्वालेयर, जम्मू काश्मीर (राजुरी) या ठिकाणी देशसेवा केली. त्यांच्या पश्‍चात दोन मुले पत्नी आई-वडील व भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. गावाकडे सुट्टीवर असताना ते मनमिळावू स्वभावामुळे ग्रामस्थांच्या परिचित होते. त्यांचे मूळ गाव गुजरवाडी हे आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे कुटुंबीय वाठार स्टेशन येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांनी सातारा पोलीस दलात कार्य केले होते. निधनाची बातमी कळताच वाठार स्टेशन पंचक्रोशीवर दुखःचे सावट पसरले. आज सकाळपासून वाठार येथील व्यापार्‍यांनी बाजारपेठ संपूर्णपणे बंद ठेवून श्रध्दांजली वाहिली दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ततपूर्वी शहीद जवान विशाल पवार यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रॉली तुन अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी दुतर्फा उभे राहून फुलांची आदरांजली वाहिली सातारा पोलीस दलाच्या वतीने त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी आ. महेश शिंदे, आ. दिपक चव्हाण, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सरपंच नीता माने, लष्कराचे अधिकारी, जवान, पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS