Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता व्हेंटिलेटरवर 

नाशिक प्रतिनिधी - लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाल्याने अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लासल

स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व तरुणांमध्ये रुजवणे आवश्यक – डॉ अभिमन्यू ढोरमारे
नगरमध्ये समस्या…दूषित पाणी-खड्डे-बंद पथदिवे-मोकाट कुत्री व जनावरे
राज्यपालांच्या संवैधानिक जबाबदारीचे काय ?

नाशिक प्रतिनिधी – लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाल्याने अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लासलगांव नवीन बाजार समिती शेजारील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाच्या वतीने विशेष  दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे खड्डे आता रुग्णाच्या जीवावर उठले का असा प्रश्न याकडे बघितल्यावर मनात उपस्थित केला जात आहे.  ग्रामीण रुग्णालयाकडे रात्रीच्यावेळी उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांना पथदिवे नसल्याकारणाने अंधारामध्ये जावे लागत आहे.  या रस्त्या लगत  लाईटची व्यवस्था करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षेमुळे रुग्णांची हेळसांड होत असून सदरचा रस्ता हा शेवटच्या घटका मोजत असल्याने आमदार छगन भुजबळ यांनी लक्ष देत रस्ता करत  पथदिवे बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे . 

COMMENTS