Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लालपरीच्या कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

9 ऑगस्टपासून 13 संघटना पुकारणार संप

 मुंबई ः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिल्यामुळे लालपरीचे चाके थांबण्याची चिन्हे आहेत. परिवहन महा

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान अटकेत
इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला बैठक
अमिताभ बच्चन यांच्या ‘उचाई’ चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर रिलीज.

 मुंबई ः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिल्यामुळे लालपरीचे चाके थांबण्याची चिन्हे आहेत. परिवहन महामंडळाच्या 13 संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी 9 ऑगस्टपासून संपाचा इशारा दिला आहे. ऐन सणासुदीत पुन्हा एकदा एसटीच्या प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांना वेतन वाढीसाठी कर्मचार्‍यांनी संपाचा इशारा दिला आहे.
राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने ध्येयवेतन वेळेत न दिल्याने आधीच एसटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली होती. बजेट प्रोव्हिजन नसल्याचे सांगत वेतन देण्यास विलंब करण्यात आल्याने एसटी कर्मचार्‍यांना महिनाभर हक्काचे वेतन मिळाले नाही परिणामी आता पुन्हा एकदा एसटी कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दीर्घकालीन संपानंतर एसटीला खर्चाला कमी पडणारी रक्कम सलग चार वर्षे देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये शासन निर्णय परिपत्रक प्रसारित करण्यात आले. मात्र ते 31 मार्च 2024 पर्यंत म्हणजेच एक वर्षासाठी काढण्यात आले. एक वर्षासाठीचे परिपत्रक काढल्यानंतर सुद्धा खर्चाला कमी पडणारी रक्कम फक्त तीन महिने देण्यात आली.

COMMENTS