Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगर मध्ये होणार्‍या पांढरे वाळ महामोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे- पत्रकार विष्णु राठोड

आरक्षणाचे जनक राजश्री, छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महानायक वसंतरावजी नाईक यांच्या अथक परिश्रमातून आ

राष्ट्रीय महामार्गाला भेगा; अपघाताला निमंत्रण
कर्करोग जनजागृती व उपचार ही काळाची गरज ः मंत्री महाजन
पबजी गेम खेळणार्‍या दोघांना रेल्वेनं चिरडलं| DAINIK LOKMNTHAN

आरक्षणाचे जनक राजश्री, छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महानायक वसंतरावजी नाईक यांच्या अथक परिश्रमातून आणि दुरदृष्टीतून आम्हाला आरक्षण मिळाले असून, त्याचा लाभ घेवूनच आम्ही जंगलांतून खेड्यात आणि खेड्यातून शहरात आलो आहे. ज्या आरक्षणाच्या भरवशावर आम्ही सुस्थितीत आणि ऐशोआरामात जीवन जगत आहोत ते आरक्षणच आज संपुष्टात येण्याच्या मार्गावर आले आहे.
कारण अलिकडच्या काळात खुल्या प्रवर्गात मोडणा-या काही उच्च व श्रीमंत जाती ह्या आपल्या असंघटितपणाचा आणि जातीमधील नाम साधर्म्याचा गैरफायदा घेऊन असंवैधानिक मार्गाने बोगस जात प्रमाणपत्र आणि बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून नौकरी मिळवित आहेत. त्यामुळे विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचे  जे खरे हक्कदार आहेत त्यांना नौकरीपासून वंचित राहावे लागत आहे.विमुक्त जाती आणि भटक्या जमातीत होणा-या घुसखोरीला आणि जात चोरली प्रतिबंध लावण्यात यावा, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मागणी समाजाच्या विविध संघटनांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र हे दलबदलू शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. एवढेच नव्हे तर संकटकाळी शक्ती प्रदर्शनासाठी समाज बांधवांचा वापर करणारे, पुर्वजांच्या पुण्याईने निवडून येणारे आमचे लोकप्रतिनिधी देखील मुग गिळुन, झोपचे सोंग घेऊन पडले आहे. आमदार, खासदारांचे स्वप्न पाहणारे आमचे स्वयम् घोषित महंत देखील आज मंदिरात घंटा वाजवत बसले आहेत.अवैध जात प्रमाणपत्राच्या  आधारे नौकरी मिळविणा-यां कर्मचार्‍यांची आणि अवैध जात प्रमाणपत्र देणार्‍या अधिका-यांची विशेष चौकशी पथकामार्फत (एस. आय. टी) चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बंजारा समाजाचे सळसळते रक्त असलेल्या तरुण तडफदार आमदार राजेश राठोड यानी विधान परिषदेत लक्ष्यवेधी प्रश्न मांडला.या प्रश्नाला उत्तर देतांना सभागृहात सरकारच्या वतीने एका जबाबदार मंत्री महोदयांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करू, त्यासाठी विशेष चौकशी पथकाची (डखढ) नेमणूक करु, दोषींवर कारवाई करु आणि विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या लोकांना न्याय मिळवून देवू,असे आश्वासन देऊन विमुक्त भटक्या समाजाला काहींसा सुखद धक्का दिला. पण, त्यांचे हे आश्वासन म्हणजे  लबाडाचे आवतन ठरले. वरिष्ठांच्या म्हणा की, इतर जातचोर लोकांच्या दबावाखाली येऊन अठ्ठेचाळीस तासांतच या मंत्री महोदयांनी  यापूर्वी मी सभागृहात  डखढ लागू करण्याबाबत जे बोललो होतो,ते चुकुन बोललो होतो. भविष्यात मी डखढ समिती नेमणार नसल्याचे सभागृहात घोषित केले आणि पल्लवीत झालेल्या विमुक्त भटक्यांच्या आसेवर पाणी फिरवले.सभागृहात साफ-साफ खोटे बोलणारे हे खोटार्डे सरकार घुसखोरी आणि जातचोरी करणार्‍या लोकांच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे आहे हेच त्या मंत्री महोदयांनी आपला शब्द फिरवून सिद्ध केलेले आहे. सभागृहामध्ये सामाजिक न्यायाची घेतलेली भूमिका बदलविणा-या आणि आपल्या संपूर्ण विमुक्त जाती भटक्या जमातीची क्रुर चेष्टा करणा-या या धोकेबाज शासनाला आणि सभागृहात मुके आणि बहिरे झालेल्या बंजारा समाजातील लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमातीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या घटनात्मक अधिकार व हक्काचे संरक्षण करण्यासाठी बुधवार दिनांक 23 औगस्ट, 2023 रोजी औरंगाबाद, येथे पांढरे वादळ नावाने महामोर्चाचे आयोजन केले असून,या महामोर्चात पक्ष,सेना, संघटना, दल, समिती आणि आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून समाज घटक म्हणून आपण आपला सहभाग नोंदविणे ही काळाची गरज आहे.अन्यथा भविष्यात आपल्या मुला-बाळांना पोटाची खळगी भरण्यासाठी पाठीवर बिर्हाड घेऊन गावोगावी भटकावे लागण्याची आणि आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोर बंजारा समाजाची अशी अवस्था होऊ नये यासाठी. 23/08/2023 बुधवारी रोजी  संभाजीनगर, ( औरंगाबाद ) येथे होणार्‍या पांढरे वादळ महामोर्चा ला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्ह्यातील युवा  पत्रकार विष्णु राठोड यांनी केले आहे.

COMMENTS