https://www.youtube.com/watch?v=izqveCN81Xg राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीमध्ये विधवा, निराधार, घटस्फोटित किंवा ज्या महिला
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीमध्ये विधवा, निराधार, घटस्फोटित किंवा ज्या महिलांचे पालक, पती दोघेही हयात नाहीत अशा लाभार्थींना ई-केवायसीच्या नियमांमुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आता अशा महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आधार क्रमांक नसतानाही ई-केवायसी पूर्ण करता येणार असून अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा त्या घटस्फोटित आहेत, अशांना आधारच्या जागी अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश सादर करता येणार आहे. या कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार असून सेविका त्याची तपासणी करून त्या महिलांना पती-वडील यांच्या ई-केवायसीमधून सूट देण्याची शिफारस पुढे पाठवतील. हा निर्णय योजनेतील पारदर्शकता राखत एकल महिलांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी घेतला गेल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS