Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूर विभागातील तिकीट निरीक्षकांचा गौरव

सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी करण्यात आघाडीवर

सोलापूर ः सोलापूर रेल्वे विभागात सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कामगिरी करणार्‍या तिकीट निरीक्षकांचा गौरव करण्यात आला आहे.  सोलापूर रेल्वे विभागाचे वि

अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांच्याकडून आदिलाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी
धावत्या रेल्वेतून उतरताना वकीलाचा मृत्यू
तुळजाभवानी मंदिरातील 200 किलो सोनं वितळवण्यास परवानगी

सोलापूर ः सोलापूर रेल्वे विभागात सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कामगिरी करणार्‍या तिकीट निरीक्षकांचा गौरव करण्यात आला आहे.  सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागात मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कामगिरी केल्याने तिकीट निरीक्षकांना सम्मानित करण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेल्या तिकीट निरीक्षकांमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वात जास्त तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षक  एस.ए.उबाळे यांनी 1 एप्रिल 2023 ते  मार्च 2024 पर्यंत वर्षभरात सर्वाधिक म्हणजेच 56 लाख 44 हजार 555 इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. एस.के.झा यांनी 1 एप्रिल 2023 ते  मार्च 2024 पर्यंत वर्षभरात दुसर्‍या क्रमांकाचा  50 लाख 9 हजार 10 इतक्या रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. जी.एस.राजापुरे यांनी 1 एप्रिल 2023 ते  मार्च 2024 पर्यंत वर्षभरात तिसर्‍या क्रमांकाचा  48,54,795 इतक्या  रुपयांचा तिकीट तपासणी दंड वसूल केला. एका महिन्यात सर्वाधिक तिकीट महसूल गोळा केलेले तिकीट निरीक्षकांमध्ये सर्वात वरच्या स्थानी एस.ए.उबाळे यांचा समावेश असून त्यांनी मे 2023 मध्ये एकाच महिन्यात 10,12,225 रुपये इतका दंड वसूल करून दिला.  एका महिन्यात सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या यादीत दुसर्‍या स्थानकावर एस.के.झा यांचा समावेश असून त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये एकाच महिन्यात 7,11,320 रुपये इतका दंड वसूल करून दिला. एका दिवसांत सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या  यादीत सर्वात वरच्या स्थानी फझील शेख यांचा समावेश असून त्यांनी 22 मार्च 2023 मध्ये एकाच दिवसात 1,02,040 रुपये इतका दंड वसूल करून दिला.  एका दिवसांत सर्वाधिक तिकीट तपासणी दंड वसूल केलेल्या तिकीट निरीक्षकाच्या  यादीत सर्वात दुसर्‍या स्थानी एस.ए.उबाळे यांचा समावेश असून त्यांनी 20 एप्रिल 2023  मध्ये एकाच दिवसात 1,01,030 रुपये इतका दंड वसूल करून दिला. यांच्या व्यतिरिक्त उत्कृष्ट कामगिरी साठी, शैलेंद्र, एस.एम.धामने, व्ही.बी.कोटकर, एस.के.मीना, संजीव कुमार, आर.के.मीना, मोबीन शेख, व्ही.डी.साळवे, प्रांजल ताटे, प्रिती धावणे आदींचा सम्मान वरिष्ठ वाणीज्य व्यवस्थापक योगेश पाटिल यांच्या हस्ते करण्यात आला.

COMMENTS