कुडाळ: प्रशासनाकडून यावर्षांपासून पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृतरित्या उठवण्यात आली असून 31
कुडाळ: प्रशासनाकडून यावर्षांपासून पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृतरित्या उठवण्यात आली असून 31 ऑगस्ट पर्यंत आता पीओपी गणेश मूर्ती विकण्याची सवलत मिळाली आहे.यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्णयाचे संपूर्ण जावली तालुक्यातील कुंभार समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे कुंभार समाजावरील आर्थिक संकटाचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.यावर्षी कमी वेळेत शाडूच्या गणेश मूर्ती तयार करून गणेश भक्तांपर्यंत पोहोचवणे हे कमी कालावधीत शक्य नव्हते. परंतु प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी आम्ही पीओपी मूर्तीची विक्री करू शकणार आहे.पर्यावरण पूरक दृष्ट्या प्रशासनाने भविष्यात शाडू मूर्ती निर्मितीचा निर्णय घेतला आहे याला आमची सहमती आहे असे कुंभार समाजाच्याकडून सांगण्यात आले आहे.
प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे कुंभार समाजाकडून आता गणेश मूर्ती बनवण्यास गतीने सुरुवात झाली आहे.लहान मुलांपासून ते महिला मूर्ती कलाकार या मूर्ती टायरा करण्यात व्यस्त झाले आहेत.गणेश मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले असून प्रशासनाच्या निर्णयामुळे यावर्षीकरता कुंभार समाजाला दिलासा मिळाला आहे.
जिल्हा प्रशासनाने कुंभार समाज यावर्षीकरता पीओपी मूर्ती विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आम्ही कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत. तसेच पर्यावरण पूरक अशा शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचा निर्णय जर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करू. या निर्णयामुळे कुंभार समाजावर आलेले संकट यावर्षी करता दूर झाले आहे. त्यामुळे कुंभार समाजाचा आर्थिक संकट दूर होण्यास मदत झाली आहे.
श्री.विरेंद्र शिंदे (माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुडाळ.)
COMMENTS