मुंबई : मुंबई शहरातील अंधेरी येथील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना 18 जानेवारी रोजी घडली

मुंबई : मुंबई शहरातील अंधेरी येथील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना 18 जानेवारी रोजी घडली होती. या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवासी भयभीत झाले होते. स्थानिक नागरिकांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
या प्रकरणात अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कमल रशीद खान उर्फ केआरके याचे नाव पुढे आले असून मुंबई पोलिसांनी त्याला मुख्य संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला ओशिवरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केआरकेविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले असून तो या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. त्याच्या अटकेनंतर बॉलीवूड आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस केआरकेच्या जवळच्या व्यक्तींशीही चौकशी करत आहेत.

COMMENTS