संगमनेर (प्रतिनिधी)--आजच्या आधुनिक युगामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात योगदान देत आहे. मात्र पूर्वीच्या काळी स्त्रियांना घ

संगमनेर (प्रतिनिधी)–आजच्या आधुनिक युगामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात योगदान देत आहे. मात्र पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडणे अवघड होते .या स्त्रियांना शिक्षणातून सक्षम घडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरव उद्गार कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी काढले आहे.
रायतेवाडी येथे कैलासवासी अनुसया गंगाधर मंडलिक यांच्या स्मरणार्थ जि प शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,महात्मा ज्योतिबा फुले ,संत सावता महाराज , व सरस्वती देवीच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख संचालक संतोष मांडेकर, सौ प्रमिलाताई अभंग सरपंच हरिभाऊ मंडलिक, उपसरपंच रेश्मा ताई शिंदे, मच्छिंद्र बांगर, माधव मांडेकर, सचिन आहेर ,दशरथ मंडलिक, गंगाधर मंडलिक, माजी सरपंच सतीश तनपुरे, शिवदास मंडलिक आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. यावेळी बोलताना डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे या पाठीमागे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आहे. ज्या काळामध्ये स्त्रियांना घराबाहेर पडणे अवघड होते त्या काळामध्ये त्यांनी अंधश्रद्धा व पारंपारिक रुढी विरुद्ध आवाज उठवत स्त्री शिक्षणाचा ऐतिहासिक लढा दिला यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. मात्र त्यातून स्त्रियांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली आणि आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांच्या योगदान देत आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आहे. शिक्षणाबरोबर आता स्त्रियांसाठी आरोग्य शिक्षण ही अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी जगाला समतेची शिकवण दिली. रायतेवाडी येथे झालेले स्मारक ही विद्यार्थी व नागरिकांना सदैव प्रेरणा दिन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर रणजीत सिंह देशमुख म्हणाले की सध्या समाजामध्ये जातीभेदाचे राजकारण होत आहे परंतु मानवता हाच खरा धर्म असून सर्वांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास एक सदृढ समाज निर्माण होईल. यावेळी संतोष मांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी रायतेवाडी परिसरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
COMMENTS