Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात क्रांती दिन व माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शपथ घेऊन ग्रंथप्रदर्शन संपन्न 

केज प्रतिनिधी - स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक 9 आगस्ट2023 रोजी क्रांतीदिन,व माझी माती माझा देश शपथ घेऊन ग्रंथप्रदर

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता
ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर
बाजार समित्यांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार

केज प्रतिनिधी – स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक 9 आगस्ट2023 रोजी क्रांतीदिन,व माझी माती माझा देश शपथ घेऊन ग्रंथप्रदर्शनाने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मा.सरपंच रामराजे गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंचपती गोविंद गायकवाड,दादासाहेब गायकवाड ,शेषेराव गायकवाड,रविंद्र गायकवाड,नारायणभाऊ गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,सुंदर पाटील, यांची ऊपस्थिती होती.
सर्वप्रथम ग्रंथप्रदर्शनाची मांडणी करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन पुजन व वंदन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व वाचक,ग्रामस्थ यांनी खालीलप्रमाणे शपथ घेतली.आम्ही शपथ घेतो की,-भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणी विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मुळापासुन नष्ट करु. देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु.भारताची एकात्मता बलशाली करु,आणी देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगु.देशाचे नागरीक म्हणुन सर्व कर्तव्याचे पालन करु.अशी सर्वांनी हात पुढे करुन शपथ घेतली.शपथेचे वाचन आनंद गायकवाड यांनी केले.यावेळी शपथेनंतर ग्रंथप्रदर्शन घेण्यात आले. या वेळी सर्व संबंधीत मराठी ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आले होते.या प्रसंगी सरपंच पती गोविंद गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच दादासाहेब गायकवाड , शेषेराव गायकवाड,रविंद्र गायकवाड,नारायणभाऊ गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप रामराजे गायकवाड यांनी केला. ग्रंथ प्रदर्शनाचा वाचक, युवक,विद्यार्थी यांनी मनसोक्त लाभ घेतला.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य,जेष्ठ समाजसेवक वसुदेव गायकवाड यांनी केले. याकार्यक्रमाचेसुञसंचलन दादासाहेब गायकवाड यांनी केले व आभार ग्रंथालयाचे आनंद गायकवाड यांनी मानले.

COMMENTS