Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयते, चाकू घेऊन दहशत करणारे सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे ः पुण्यात सिंहगड लॉ कॉलेज परिसरात बुधवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन परिसरातील दुकानदारांवर

परभणीतील बंदला हिंसक वळण ; संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर तणाव
वानटाकळी, वाघाळा येथे कापूस पिकाची शेतीशाळा संपन्न
पोटच्या २ मुलांची हत्या करून आईने केली आत्महत्या;कारण ऐकून व्हाल थक्क | LOK News 24

पुणे ः पुण्यात सिंहगड लॉ कॉलेज परिसरात बुधवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन परिसरातील दुकानदारांवर आणि रस्त्याने जाणार्‍या नागरिकांवर वार करत त्यांना चाकूने भोसकले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न हा ऐरणीवर आला आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली असून केवळ दहशत पासरवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी गुरवारी दिली आहे.

 या प्रकरणी या प्रकरणी भारती पोलिस ठाण्यात विद्यार्थी अथर्व लडके (वय 19, मु. रा. लातूर) याने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी करण दळवी आणि सुजीत गायकवाड (दोघेही रा. वडगाव, सिंहगड परिसर,पुणे) यांच्या विरोधात खूनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर या पूर्वही खूनाचा प्रयत्न, चोरीचा आणि खंडणीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आरोपी गायकवाड यास अटक करण्यात आली आहे तर फरार झालेला आरोपी दळवी याचा पोलिस शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणार्‍या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात आरोपी करण दळवी आणि सुजीत गायकवाड या दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज रस्त्यावर त्यांनी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हातात चाकू, सूरे घेऊन दहशत निर्माण केली. या ठिकाणी असलेल्या अनेक दुकांनात त्यांनी जात तसेच रस्त्यावर असणार्‍या अनेकांना त्यांनी विनाकारण त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. नागरिक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळू लागले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, या दोघांच्या हल्ल्यात दोन नागरिक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी एका आरोपींचा पाठलाग करून अटक केली आहे. त्यांनी हे कृत्य का केले असे विचारल्यावर परिसरात दहशत निर्माण करायची होती, त्यासाठी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS