पुणे : महाविद्यालयाच्या आवारात कोयता व सुरा घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात होता. शिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील धमकवले जात ह

पुणे : महाविद्यालयाच्या आवारात कोयता व सुरा घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात होता. शिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील धमकवले जात होते. या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अद्दल घडवायसाठी महाविद्यालयात धिंड काढली. पुणे शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात भररस्त्यावर तरूणीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात झाला. यानंतर देखील महाविद्यालयाच्या आवारात कोयता व सुरा घेवून दहशत निर्माण करण्याची हिंमत तरूणांनी केली. मात्र कोयता घेऊन दहशत माजवणार्या या टोळक्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
COMMENTS