Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय

पुणे : मार्केट यार्ड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात टोळक्याने कोयते, तलवारी उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने एका तरुणाला जी

विरोधी पक्षनेते दानवे आणि पालकमंत्री भुमरेंमध्ये जुंपली  
 नराधम बापानेच केला मुलीवर बलात्कार
3 लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अटकेत

पुणे : मार्केट यार्ड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात टोळक्याने कोयते, तलवारी उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून नागरिकांना शिवीगाळ केली. याप्रकरणी राहुल उर्फ लल्या कांबळे (वय 19), शुभम कांबळे (वय 20), डुई ताकतोडे (वय 21), जग्या (चौघे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अरशद इस्माइल बागवान (वय 19, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवानच्या भावाचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी रात्री बागवानच्या घराजवळ आले. त्यांनी तलवारी आणि कोयते उगारून दहशत माजविली. बागवानचे वडील, तसेच शेजारी राहणारे शालम शेख यांना कोयत्याचा धाक दाखविला. आम्ही आंबेडकरनगरचे दादा आहोत, अशी धमकी देऊन घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत

COMMENTS