Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कोतवालीची कारवाई

अहमदनगर : वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम कोतवाली पोलिसांनी सुरु केली.असून पोलिसांनी माळीवाडा परिसरात दोन वाहनावर गुन्

केडगावमध्ये भरदिवसा तीन तोळ्याचे दागिने लांबविले
माझी लोकशाही-माझा फळा ; फलकलेखन स्पर्धेचे आयोजन
जायकवाडीला पाणी सोडणे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

अहमदनगर : वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम कोतवाली पोलिसांनी सुरु केली.असून पोलिसांनी माळीवाडा परिसरात दोन वाहनावर गुन्ह्याची नोंद केली.

या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनावर कारवाई करीत असताना माळीवाडा वेस कॉर्नर जवळ एक मॅक्झिमा कंपनीची प्रवाशी रिक्षा (क्रमांक एम एच सोळा सी ई 2105) रिक्षा चालकाने वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध उभी केली असल्याचे मिळून आले. पोलीसांनी त्या चालकास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राहुल सुदाम आंग्रे (वय 47 रा. रभाजीनगर, केडगाव, अ.नगर) असे असल्याचे सांगितले.या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल तोहसिंन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल आंग्रे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 283 अन्वये गुन्ह्याची नोंद केली.

दुसऱ्या कारवाईत कोतवाली  पोलिसांनी माळीवाडा परिसरात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनावर कारवाई करीत असताना पुणे बसस्थानक समोर  एक सुझुकी कंपनीची डिझायर कार (क्रमांक एम एच बारा व्हि एफ 2405) वरील चालकाने त्याचे वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध उभी केली असल्याचे मिळून आले. पोलीसांनी त्या चालकास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आप्पासाहेब सोमनाथ दौड (वय 26 रा. सोनोशी तालुका पाथर्डी अ.नगर) असे असल्याचे सांगितले.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल तोहसिंन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आप्पासाहेब दौंड याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 283 अन्वये गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS