कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपरिषदेमार्फत रविवारी स्वच्छता हि सेवा अंतर्गत गोदावरी नदी काठावर गोदामाईची स्वच्छता आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे
कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपरिषदेमार्फत रविवारी स्वच्छता हि सेवा अंतर्गत गोदावरी नदी काठावर गोदामाईची स्वच्छता आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन तसेच कोपरगाव शहरातील चौदा प्रभाग, बस स्थानक परिसर व रेल्वे स्टेशनच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. स्वच्छ्ता पंधरवडा- स्वच्छ्ता हि सेवा2023 चा एक भाग म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशभरात 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. नागरिकांच्या नेतृत्वाखाली एक मोठी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली होती.
2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान आणि इतर मान्यवर देखील जमिनीवर स्वच्छ्ता उपक्रमात सामील होणार आहेत. त्याअनुषंगाने कोपरगाव नगरपरिषदेमार्फत आज सकाळी दहा वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदी काठावर गोदामाईची स्वच्छता करण्यात आली. तसेच यावेळी स्व.सूर्यभान वहाडणे पाटील घाटावर स्वच्छता शपथ घेण्यात आली.त्याचवेळी शहरातील चौदा प्रभाग, बस स्थानक परिसर व रेल्वे स्टेशनच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. कोपरगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आपल्या शहरातून पवित्र अशी दक्षिण गंगा गोदावरी नदी वाहते. तिचे पावित्र्य राखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा कचरा, निर्माल्य, पूजेचे साहित्य तसेच देवी-देवतांचे फोटो नदीपात्रात टाकू नये व गोदामाईस स्वच्छ ठेवावे असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले. यावेळी स्व. नामदेवरावजी परजणे लॉ कॉलेजचे हिरालाल महानुभव, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, बाळासाहेबजी रुईकर, संतोष गंगवाल, तुषार विध्वंस तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी- कर्मचारीवृंद, स्व. नामदेवराव परजणे पाटील लॉ, नर्सिंग, के.जे.एस.सोम्मैया महाविद्यालयाचे एन.एस.एस.शाखेचे विद्यार्थी तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते. सदर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,स्वच्छता निरीक्षक सुनिल आरण, नोडल ऑफिसर तथा संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे,शहर समन्वयक प्रविण मोरे,तसेच नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS