Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोळपेवाडी महेश्‍वर यात्रा महोत्सव जल्लोषात

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील कोळपेवाडी पंचक्रोशीचेचे आराध्य दैवत महेश्‍वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न होवुन यात्रा काळात एक ल

अवघी दोन दिवसाची सवलत…मनपाने केले पुन्हा सर्व बंद ; किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतला होता आक्षेप
रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…
कोपरगाव तालुक्यात 26 सरपंच पदासाठी 85 उमेदवार रिंगणात

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील कोळपेवाडी पंचक्रोशीचेचे आराध्य दैवत महेश्‍वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न होवुन यात्रा काळात एक लाखाच्या पुढे भाविकांनी महेश्‍वर चरणी नतमस्तक होत नवसफेड केली. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोळपेवाडी पंचक्रोशीचे आराध्य दैवत महेश्‍वराची पहाटे अभंग्य स्नानाने अंघोळ घालत पुजारी जनार्दन कोळपे यांनी महेश्‍वरास नववस्र परिधान केले सामुहिक आरती होवुन शंखनाद करत यात्रेची सुरुवात झाली.
            सकाळी युवकांनी गोदावरी नदी वरुन आणलेल्या कवाडीची सवाद्य मिरवणूक होवून महेश्‍वरास जलाभिषेक करण्यात आला. आमदार आशुतोष काळे यांनी कावड खाद्यांवर घेत संबळाच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. देवाचे भगत म्हताबाबा कोळपे यांनी सांयकाळी सहा वाजता बारा गाड्या शिव रस्त्यापासून लक्ष्मी आईच्या मंदिरापर्यंत ओढत नेल्या. त्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी करत दर्शन घेतले. युवानेते विवेक कोल्हे यांनी प्रथम गाडीवर बसुन भाविकाचा उत्साह द्विगुणित केला. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी महेश्‍वराचे दर्शन घेत, भाविकांना शुभेच्छा दिल्या. सांयकाळी शहाजापूर व कोळपेवाडी गावचे तकतराव मिरवणूकीमध्ये बँजोच्या तालावर शेकडो युवकांनी ठेका धरत जल्लोष केला. रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमासह लावणी फेम गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाने महेश्‍वर यात्रेची शोभा वाढवली. बैलगाडा शर्यत जंगीकुस्ती हंगामात कोळपेवाडी केसरी मानाची गदा पहिलवान विवेक थोरात याने पटकावत गावचे नाव महाराष्ट्राभर पोहचवले. यात्रा कमेटी बंजरंग कुस्ती केंन्द्र व ग्रामस्थांनी यात्रेचे केलेले उत्कृष्ट नियोजन कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले यांनी यात्रा काळात चोक बंदोबस्त ठेवल्याने महिलाचे दागदागिने चोरट्या पासुन सुरक्षित राहुन पाकिटमारी मोबाईल फोन चोरी च्या घटनांना आळा बसुन गर्दी चा उच्चांक गाठणार्या गौतमी पाटील यांचा लावणी कार्यक्रम कुठलाही अनुचित प्रकार न घडता सुरक्षित पार पडला. चार दिवस चाललेल्या यात्रा महोत्सवामध्ये भाविकांनी दंडवत लोटांगण गळ लावत महेश्‍वरास नारळाचे तोरण बांधून पेढे शेरणी वाटत नवस बोललेले लहान बालक महेश्‍वराच्या चरणी ठेवत मनोभावे नवसपूर्ती भाविक डफ वाद्याच्या निनादात करत होते.

COMMENTS