कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी गुरूवार

कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी गुरूवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसेच एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उद्भवू नये, या पद्धतीने अलमट्टी धरणातून होणार्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी विनंती सतेज पाटील यांनी निवेदनातून केली. सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिला.
COMMENTS