चंदगड तालुक्यातील उमगाव सावतवाडी भागांमध्ये गेले चार दिवस टस्कर हत्तीनी धुमाकूळ घातला आहे. या हत्तींमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
चंदगड तालुक्यातील उमगाव सावतवाडी भागांमध्ये गेले चार दिवस टस्कर हत्तीनी धुमाकूळ घातला आहे. या हत्तींमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
गोविंद गावडे, राम धुरी, एकनाथ धुरी, अर्जुन धुरी, भरत गावडे, संजीवनी धुरी,अर्जुन रेडकर,अर्जुन सावंत या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी वनविभागाने भेट देऊन पाहणी दौरा करत पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
यावेळी वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले,वनपाल दयानंद पाटील,वनमजूर गुंडु देवळी उपस्थित होते.तर दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली नाही तर वनखात्याच्या विरोधात कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष व गावचे माजी सरपंच सटूप्पा पेडणेकर यांनी दिला आहे.
COMMENTS