दिवंगत गायक केके यांच्या पत्नी ज्योती कृष्णा(Jyoti Krishna) यांनी सोशल मीडियावर एका पेंटिंगचा फोटो पोस्ट केला. ही पेंटिंग त्यांनी स्वत: काढली आहे. ज
दिवंगत गायक केके यांच्या पत्नी ज्योती कृष्णा(Jyoti Krishna) यांनी सोशल मीडियावर एका पेंटिंगचा फोटो पोस्ट केला. ही पेंटिंग त्यांनी स्वत: काढली आहे. ज्योती या पेशाने चित्रकार आहेत. केके(Kk) यांच्या निधनानंतर त्यांनी काही काळ पेंटिंग काढणं थांबवलं होतं. दरम्यान त्यांनी केकेसोबतचीच सुंदर पेंटिंग काढली आहे. ‘पुन्हा चित्र काढण्याचा प्रयत्न करतेय, मिस यू स्वीटहार्ट’,(Miss you sweetheart) असं कॅप्शन देत त्यांनी पेटिंगचा फोटो पोस्ट केला. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

COMMENTS