Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किसन वीर साखर कारखाना निवडणूकीचे वारे; राष्ट्रवादीच्या आमदारासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे अवैध अर्ज वैध; जिल्हा उपनिबंधक मोहन माळी यांची घोषणा

वाई / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणार्‍या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी गेल्या

पुसेगाव येथे बैलबाजार न भरल्याने शेतकरी अडचणीत
टॉमेटो आजपासून 40 रुपये किलो मिळणार
कांद्याचा दर झाला दुप्पट , आणखी दर वाढण्याची शक्यता 

वाई / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणार्‍या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी गेल्या दोन दिवसापासून प्रचंड गदारोळ सुरु होता. कारखान्याचे व जिल्हा बँकेचे दिवंगत चेअरमन माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील आणि दुसरे पुत्र जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील या दोघांचेही अवैध ठरवलेले अर्ज आज वैध ठरले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मोहन माळी यांनी अधिकृतरित्या प्रसारमाध्यमांना दिली.
वाई तालुक्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखानासाठी 3 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी दि. 28 मार्च रोजीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये आ. मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील यांनी पाच वर्षात केवळ दोन वेळा कारखान्याला ऊस घातल्याने त्यांचे नाव अवैध उमेदवारांच्या यादीत आले होते. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यावर आमदार गटाने हरकत घेत वकील यांच्यामार्फत आपले म्हणणे मांडले. आमदार गट आणि किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने मांडलेली बाजू ऐकून आणि कागदपत्रांची तपासणी करून जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील यांचे अर्ज वैध असल्याची घोषणा मंगळवार, दि. 5 रोजी सकाळी केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह त्यांच्या समर्थक आणि अखेर सुटकेचा निश्‍वास सोडला.
दरम्यान, अर्ज वैध ठरल्यामुळे खंडाळा, जावळी तालुक्यापाठोपाठ वाई तालुक्यातील साखर कारखाने आता राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठा विजय मानला जात आहे. गेल्या कित्तेक वर्षामध्ये दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती कारखान्याच्या संचालक मंडळात नव्हती. गत निवडणूकीत अर्ज भरलेला माघारी घेत कारखान्यामध्ये राजकारण नको, असे जाहिर करत आ. मकरंद पाटील यांनी माघार घेतली होती. मात्र, आता कारखाना अडचणीत आला असल्याचे लक्षात आल्यानंतर आ. पाटील कुटुंबियांनी त्यामध्ये लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे.

COMMENTS