Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमैया यांची माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका 

कोल्हापूर प्रतिनिधी - माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर झालेल्या ईडी कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झाले

शेल्टी येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाँचद्वारे सुरक्षित प्रवास
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात
राहुल गांधींनी अटलजींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी – माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर झालेल्या ईडी कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच जंगी स्वागत केल असून किरीट सोमैया आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहे. किरीट सोमैया कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल होत असताना हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जी काही माफीया गिरी सुरू आहे. हे आता बंद होत असून त्यांच्यावर कारवाई होत आहे. काहीजण आत गेले, काहीजण बाहेर आले, तर काही जणांवर कारवाई होत आहे. यामुळे यांच्याशी लढण्यासाठी मला शक्ती मिळावी,  यासाठी मी अंबाबाई चरणी आलो आहे. असे  किरीट सोमैया म्हणाले आहेत. 

COMMENTS