Homeताज्या बातम्याशहरं

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत किर-किर; भाजपमध्ये उकळ्या

इस्लामपूर /प्रतिनिधी : इस्लामपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या श्रेयवादावरून राजकारण तापले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आनंद

आबा गट इस्लामपूर पालिका निवडणुकीत 4 प्रभाग लढविणार
फसवणूक करणारे ते मिस्टर नटवरलाल : खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
जरंडेश्‍वरला भुयारी मार्गात दगडगोटे

इस्लामपूर /प्रतिनिधी : इस्लामपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या श्रेयवादावरून राजकारण तापले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आनंदराव पवार यांच्या पाठपुराव्याने शहरातील रस्त्यांसाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, काही दिवसात या निधीला स्थगिती देण्यात आली. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक समोरा-समोर आले आहेत. हे एका बाजूला असले तरी भाजपमध्ये आता उकळ्या फुटल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. शिवसेनेने आणलेल्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी बोलविलेल्या तीन ही विशेष सभेला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे सभागृहात विकासकामांना मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरासमोर ढोल-ताशा बजाओ आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना, विकास आघाडीच्या नेत्यांनी दिला होता.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी नगरविकास खात्याकडून 11 कोटीं रुपयांच्या निधीला स्थगिती दिली होती. त्यामुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली. हा निधी कोणामुळे थांबला? याबाबत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. शहरासाठी आलेला निधीत राजकारण आणू नका, अशी भूमिका भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी घेतली होती. या निधीतून शहरातील 84 रस्ते आणि गटारीची कामे पूर्णत्वास गेली असती, असे त्यांचे म्हणणे होते.
राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि पालिकेतील शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार हे संतप्त झाले आहेत. ते राष्ट्रवादी नगरसेवकांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडण्याच्या तयारीत आहेत. हे एका बाजूला असताना पालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे श्रेयवादाचे राजकारण टोकाला गेले आहे. एकमेकांची उणी – दुणी काढण्याची एकही संधी नेते मंडळी सोडत नाहीत. यातूनच विकास कामांना खो बसत असल्याची चर्चा शहरवासीयांच्यात आहे.
जिल्हा नियोजनच्या 15 कोटीचे काय …
उपनगराध्यक्ष दादासो पाटील म्हणाले, मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत इस्लामपूर शहरासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मार्च अखेरीस घेतलेली ऑनलाईन सभा टेक्निकल कारण सांगून पुढे ढकलली. सभा घेऊन पूर्ण करून नंतर 11 कोटींची सभा घ्यावी, असे पत्र दिले होते. आमचा शहराच्या विकासासाठी विरोध नाही. जिल्हा नियोजनचे 15 कोटी व शिवसेनेने आणलेले 11 कोटी असे 26 कोटी रुपये शहराच्या विकासासाठी वापरता आले असते.

COMMENTS