Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

आरोपीला अटक ः पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

संगमनेर/प्रतिनिधी ः चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेले मेसेज अठरा वर्षे वयाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. संगमनेर शहर

पोलिसाने पोलिसावरच चालवली बंदूक… थोडक्यात टाळला अनर्थ…
नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकतीने लढवणार : दत्तात्रय पानसरे
बेलापूर महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन उत्साहात

संगमनेर/प्रतिनिधी ः चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेले मेसेज अठरा वर्षे वयाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोलिसांनी अपहरणासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
अमन सलीम मोमीन असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. अमन मोमीन याने पीडित तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला बस स्थानकावर बोलावून तेथून तिचे अपहरण केले होते. काही नागरिकांना ही अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असलेला अमन मोमीन हा गंगामाई घाटावर आढळून आला.
पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आरोपी मेसेज करत होता. वडिलांच्या मोबाईलवर सुरू असलेले हे प्रेमचाळे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या मुलीची आरोपीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातूनच पीडित मुलगी आणि आरोपी यांचा संपर्क होत असे. रविवारी सायंकाळी चार वाजता काही नागरिकांना ही अल्पवयीन मुलगी एका तरुणासोबत गंगामाई घाटावर एका आडोशाला आढळून आली. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने काही नागरिकांनी तिची विचारपूस केले असता ही मुलगी अल्पवयीन असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांच्यात सुरू असलेले प्रेम चाळे लक्षात घेता नागरिकांनी दोघांनाही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. चौकशीअंती आरोपीने पीडित तरुणीला तिच्या वडिलांच्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला संगमनेर बस स्थानकावर बोलावून घेतले होते. तेथे आधीच तयारीत असलेल्या आरोपीने तेथून त्याने तिला आपल्या दुचाकीवर प्रवरा नदीवरील गंगामाई घाटावर नेले असल्याचे समोर आले. शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमन मोमीन यांच्या विरोधात अपहरण आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

COMMENTS