खर्डा इंग्लिश स्कुलला ठोकले कूलुप

Homeताज्या बातम्याअहमदनगर

खर्डा इंग्लिश स्कुलला ठोकले कूलुप

जामखेड प्रतिनिधी /जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची असलेली खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या शाखेत ८ शिक्षक कमी असल्याने तसेच संस्थेकडे अनेक वेळा

राठोड क्षत्रिय समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी विक्रम राठोड
शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल
महात्मा फुलेंचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे

जामखेड प्रतिनिधी /
जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची असलेली खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या शाखेत ८ शिक्षक कमी असल्याने तसेच संस्थेकडे अनेक वेळा मागणी करूनही सदर शिक्षक मिळत नसल्याने या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन लोळगे व ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे.

विशेष म्हणजे या जामखेड कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे शाळेचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तरिही वारंवार मागणी करूनही या शाळेस ८ शिक्षक मिळत नसल्याने पालक व ग्रामस्थांकडून अश्चर्य व्यक्त केले जात आहे. जामखेड तालुक्यातील जामखेड नंतर खर्डा हे सर्वात मोठे गाव आहे.

येथे असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या शाखेत पंचक्रोशीतील जवळपास अडीच हजाराहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या शाळेत सद्या तरी शिक्षकांची संख्या पुरेशी नाही. मिळालेल्या माहितीनुसार येथे एकूण ८शिक्षकांची कमतरता असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अनेकवेळा निवेदन देऊनही संस्थेने शिक्षक दिलेले नाहीत.

साधारण एक वर्षापासून ८शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झालेली आहे. त्यामुळे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन लोळगे यांनी लेखी स्वरूपात शिक्षकांची मागणी केली, परंतु कसल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे ते व पालक आक्रमक होऊन काल दि.

६ जूलै रोज शाळेतील मुख्य गेटला कुलूप लावून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच पालकांकडून शिक्षकांची तातडीने भरती करून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी व लवकरात लवकर शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
या अंदोलनावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन लोळगे यांचेसह सविताताई गोलेकर, शितल शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS