Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धामणगाव पाठ येथे आजपासून खंडोबा यात्रा उत्सव

अकोले प्रतिनिधी ः अकोले तालुक्यातील धामणगाव पाठ येथे भव्य खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही भव्य दिव्य अशा

Ahmednagar : मोहरम विसर्जन उत्साहात… जागेवरच केले विसर्जन… l LokNews24
श्रीरामपुरात बिबट्याचा रंगला थरार, आठ जखमी; वन विभाग व पोलिसांनी केले जेरबंद
आढळराव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश शिंदे

अकोले प्रतिनिधी ः अकोले तालुक्यातील धामणगाव पाठ येथे भव्य खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही भव्य दिव्य अशा या यात्रा उत्सव साजरा होत आहे यात्रा उत्सवाची सुरुवात शुक्रवारी( दि.3) रोजी होत आहे. तीन दिवस हा यात्रा उत्सव सुरू राहणार आहे शुक्रवार 03 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजता विश्‍वकर्मा प्रतिमेची भव्य मिरवणूक सायं. 6 वा. महाआरती सायं. 6:30 वा. महाप्रसाद आयोजन केले आहे. शनिवारी भंडारा कार्यक्रम महाप्रसाद होणार असून रात्री 8.30 वा. सत्यपाल महाराज सप्तखंजेरी वादक यांचा कार्यक्रम होईल. रविवारी पहाटे 5 वा.महापूजा व अभिषेक पहाटे 6 वा. महाआरती स. 8 वा. भव्य काठीची मिरवणूक होणार आहे. यात लेझीम पथक, सरस्वती विद्यालय धा. पाट श्री कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था धा. पाट हे सहभागी होणार आहे तर शिवकालीन मदर्दानी खेळही होणार आहे.दु. 3 ते 4 वा. मल्हारी सप्तशती ग्रंथ पारायण रात्री 7.30 वा. तळी भंडारा कार्यक्रम रात्री 9 वा. फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. रात्री 9.30 आनंद लोकनाट्य तमाशा चा करमणूक कार्यक्रम होणार आहे. सोमवारी 06 फेबु्रवारी रोजी सकाळी 9 ते 11 वा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे तीन दिवस चालणार्‍या या भव्य दिव्य कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा उत्सव कमिटी व धामणगाव पाट ग्रामस्थांनी केले आहे.

COMMENTS