Homeताज्या बातम्यासंपादकीय

आश्‍वासनांची खैरात

निवडणुका आणि आश्‍वासन यांचे एक अतूट नाते असले तरी, निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्‍वासनांचे पुढे काय होते, हा मोठा यक्षप्रश्‍न आहे. भारताला स्वातंत्र्

पोटनिवडणुकीचा घोळ
पाणीटंचाईचे संकट
कर्तव्यतत्परतेचा धडा !

निवडणुका आणि आश्‍वासन यांचे एक अतूट नाते असले तरी, निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्‍वासनांचे पुढे काय होते, हा मोठा यक्षप्रश्‍न आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते आतापर्यंत तब्बल 17 लोकसभा निवडणूका पूर्ण झाल्या असून 18 व्या लोकसभेची निवडणूक होत आहे. मात्र यापूर्वी राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्‍वासन पूर्ण झाले का हा संशोधनाचा विषय आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु झाली आहे. लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांनी आपल्या-आपल्या पक्ष श्रेष्ठींना विनवण्यांसह दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काही पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी निवडणूक लढवताना प्रचाराचे मुद्दे निश्‍चित केले आहेत. त्यानुसारच पक्षाने दिलेल्या सुचनेनुसारच संभाव्य उमेदवार प्रचार करणार आहेत. काही पक्षाच्या नेत्यांसह काही पक्षाचे उमेदवार आपल्या-आपल्या स्टाईलमध्ये लोकांमध्ये मिळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रचाराच्या जाहिरनाम्यामध्ये धक्कादायक घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे.

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गाव तिथे बियर बार सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे धक्कादायक आश्‍वासन दिले आहे. या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खासदार निधीतून दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची धक्कादायक घोषणा केली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात आतापर्यंत 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे समजते. काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची घोषणाच चर्चेचा विषय बनली आहे. राज्यभरात व्यसनाने काय साध्य केले. किती जणांचे संसार मोडले तसेच किती जणांनी व्यसनासाठी काडीमोड घेतली. याचे भान नसल्यामुळे की काय कोणास ठाऊक मात्र महिला उमेदवारांने केलेल्या जाहीरनामा बरेच काही सांगून गेला आहे. आदीवाशी लोकांना मोहाच्या फुलांच्या मद्य निर्मितीचा विषय चर्चेचा होता. त्याचाच आधार धरून वनिता राऊत यांनी गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, अशी घोषणा केली आहे. आपण खासदार झाल्यास खासदार निधीतून दारिद्य्र रेषेखाली असणार्‍यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे राजकारण्यांनी प्रसिध्दीसाठी वापरलेल्या क्लूप्ती मतदारांना आकर्षित करणार की हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वीही राऊत यांनी नागपूर येथून 2019 ची लोकसभा, 2019 मध्ये चिमूर विधानसभा निवडणुक लढवली होती. धक्कादायक जाहीरनाम्यामुळे की कोणास ठाऊक पण दोन्ही वेळा मतदारांनी त्यांचे डिपॉझिट जप्त केले. त्या कालखंडात चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूचे दुकाने उघडण्याची मागणी केली होती. चंद्रपूर जिल्हा हा दारुसाठी प्रसिध्द असल्याने गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण त्यांचे आहे. समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्या म्हणतात. त्यांच्या मतानुसार बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी थेट बिअर बारचा परवाना देत त्यांना व्यवसायाचे मालक बनवण्याचेही आश्‍वासन देत असल्याने मतदारांमध्ये उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशा प्रकारचा जर निवडणूकीचा जाहीरनामा असेल तर मतदार उमेदवाराला मते देतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS