देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा येथील पठारे वस्तीवर राहणार्या एका कुटुंबाने फिरायला जाताना मोबाईलवर वे टू भुर्र असे स्टेटस ठेवून ते फि

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा येथील पठारे वस्तीवर राहणार्या एका कुटुंबाने फिरायला जाताना मोबाईलवर वे टू भुर्र असे स्टेटस ठेवून ते फिरायला निघून गेले. याच संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी भुर्रकन धाव घेत त्यांच्या बंद घराचे दरवाजे तोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 15 हजाराचा ऐवज लंपास केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरामधील श्रीरामपूर रस्त्यालगत पठारे वस्ती येथील मकरंद बाबासाहेब पठारे यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला व घरातील दोन ते तीन कपाटांचे दरवाजे तोडून या कपाटातील पाच तोळे सोन्याचे मौल्यवान दागिने व रोख 15 हजार रुपये असा 3 लाख 15 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला. यात चोरट्यांनी मकरंद पठारे यांच्या आईचा मोबाईल व एक लॅपटॉप चोरुन नेला आहे. या कुटुंबाने काही दिवसापूर्वीच जमीन विकली होती. त्या बदल्यात मोठी रक्कम मिळाली होती. गावाला जाण्यापूर्वी मकरंद याच्या दोन बहिणींना काही रक्कम देवून उर्वरीत रक्कम बँकेत ठेवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मकरंद पठारे यांच्यासह आई व दोन बहिणी बाहेरगावी फिरण्यासाठी गेल्या होत्या. बाहेरगावी जाताना मकरंद व त्याच्या दोन बहिणींनी मोबाईला वे टू भुर्र असे स्टेटस ठेवले होते. हे कुटुंब गावाला गेल्याच्या दिवसापासून घरी आल्याच्या रात्रीपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी-कोयंडे तोडून घर साफ करुन नेले. सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने, 15 हजार रुपये रोख, 45 हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक वस्तू असा एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. वे टु भुर्रच्या स्टेटसने चांगलाच आर्थिक दणका या कुटुंबाला दिला आहे. या कुटुंबाचे हे स्टेटस पाहूनच चोरट्यांनी येथे हात मारला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवळाली प्रवराचे पोलिस करीत आहेत.
COMMENTS