Homeताज्या बातम्यादेश

ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स तयार ठेवा कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे केंद्राचे राज्यांना नवे निर्देश

चीनमध्ये 24 तासात आढळले 3.7 कोटी कोरोनाचे रुग्ण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीन, जपान आणि अमेरिकेसह जगातील 10 देशांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून

कॉलेज परिसरात राडा, पाहा व्हिडीओ | LOK News 24
ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी ग्राहकांना महावितरणच्या  ॲपवर सुविधा
शाळांमध्ये ’वाचन चळवळ’ राबवणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीन, जपान आणि अमेरिकेसह जगातील 10 देशांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, केंद्र सरकारने दररोज देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत, जागतिक परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. शनिवारी केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स आणि व्हेटिंलेटर्स तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहे.


केंद्र सरकारने देशातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यास सुरूवात केली असून, राज्यांनी देखील जर कोरोना परिस्थिती उद्धभवली तर, त्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहे. चीनमध्ये 24 तासामध्य  तब्बल 3 कोटी 7 लाख कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आता इतर देशांचे धाब दणाणले आहे. भारतातही हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला असून केंद्राने राज्यांना नव्याने तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना निर्देश देतांना सहा मुद्दयांची अ‍ॅडव्हायझरी जाहीर केली असून, यामध्ये राज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि व्हेंटिलेटर्स तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतील तरी तिचे प्रमाण खूप नाही. पण भविष्यातील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने राज्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. नव्याने काढलेल्या अ‍ॅडव्हाझरीत वैद्यकीय पायाभूत सुविधांची देखभाल आणि त्या पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्याबाबतचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, तुमच्याकडील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणारे पीएसए प्लँट्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे तसेच त्याची नियमित तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता तसेच ते पुन्हा विनाव्यत्यय रिफील करण्याची व्यवस्थाही तयार असल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

चीनसह 5 देशांतून येणार्‍यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य – देशात कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी सांगितले. या देशांतील कोणत्याही प्रवाशामध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास या लोकांना क्वारंटाइन केले जाईल.गेल्या 24 तासांत देशात 201 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, भारतात 3,397 सक्रिय रुग्ण आहेत. रिकव्हरी रेट सध्या 98.8 टक्के आहे. लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाचा अहवाल आला आहे. त्यानुसार देशातील 75 टक्के लोकांना बूस्टर डोस मिळालेला नाही. आतापर्यंत, कोणत्याही राज्यात बूस्टर डोसचे कव्हरेज 50 टक्के पर्यंत पोहोचलेले नाही.

COMMENTS