Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परराज्यातून येणार्‍या औषधांवर नजर

अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू

मुंबई : राज्यातील बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) परराज्यातून मागविण्यात येणार्‍या औषधांची तपासणी करण्याचा निर

नदीत वाहून गेले होते दोन लहान भाऊ… मृतदेह सापडले
पुण्याला विक्रीसाठी जात असलेला लाखो रुपयांचा गांजा पोलिसांनी केला जप्त
नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात

मुंबई : राज्यातील बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) परराज्यातून मागविण्यात येणार्‍या औषधांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने परराज्यातून येणार्‍या औषधांची तपासणी सुरू केली असून, राज्यात येणार्‍या प्रत्येक औषधाची माहिती घेण्यात येत आहे.
देशामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधांची निर्मिती करणारे उत्पादक हिमाचल प्रदेशमधील बद्दी परिसरात आहेत. त्याचबरोबर गुजरात व उत्तरांचलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती केली जाते. त्यामुळे राज्यातील घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषधांची खरेदी करतात. या राज्यांतून येणारी अनेक औषधे प्रमाणित दर्जानुसार नसतात. त्यामुळे राज्यामध्ये बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे मिळण्याची शक्यता आहे. परराज्यातून मागविण्यात येणार्‍या औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने सर्व वितरकांकडे त्यांनी मागविलेल्या औषधांचा तपशील ई-मेलद्वारे सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने विभागनिहाय ई-मेल आयडी तयार करून तपशीलांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या औषधांची सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीला वितरकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वितरकांकडून आलेल्या माहितीचे काटेकोरपणे निरीक्षण व तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये बनावट औषधांचा तपशील सापडलेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली.

COMMENTS