Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटकचे डीआयजी डॉ. रामचंद्र राव निलंबित

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सरकारची तातडीची कारवाईबेंगळुरू : कर्नाटक पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागरिक हक्क अंमलबजावणी विभागाचे महासंचालक

डॉ. सिताराम कोल्हे यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती  
ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला (Video)
स्वामी विभूती म्हणजे भक्तांचे रक्षणकवच l जय स्वामी समर्थ l LOKNews24

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सरकारची तातडीची कारवाई
बेंगळुरू : कर्नाटक पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागरिक हक्क अंमलबजावणी विभागाचे महासंचालक डॉ. के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. त्यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. सोमवार (19 जानेवारी) रोजी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
व्हिडिओमध्ये राव काही महिलांसोबत अनुचित अवस्थेत दिसत असल्याचा दावा केला जात असून, या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर प्राथमिक तपासाच्या आधारे सरकारने तात्काळ निलंबनाचा निर्णय घेतला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. राव यांनी गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती होऊ शकली नाही. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना राव यांनी हा व्हिडिओ बनावट असून तांत्रिक पद्धतीने मॉर्फ करण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अधिकार्‍याचे वर्तन शासकीय सेवेस साजेसे नसून, त्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, या कालावधीत शासनाच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राव म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात कुणाचाही खोटा व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो. या व्हिडिओबाबत आपल्याला कोणतीही ठोस माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओ जुना असण्याची शक्यता व्यक्त करताना, तो कदाचित आठ वर्षांपूर्वीच्या बेळगावीतील कार्यकाळातील असू शकतो, असेही त्यांनी सूचित केले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बलकर यांनी सांगितले की, कोणाकडूनही गैरवर्तन झाले असल्यास सरकार त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. तर भाजपकडून या घटनेवर तीव्र टीका करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री एस. सुरेश कुमार यांनी हे कृत्य अत्यंत गंभीर आणि अक्षम्य असल्याचे सांगत, यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले.

COMMENTS