Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार

नवी दिल्ली : कर्नाटक सरकारचा आज शनिवारी 27 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात 24 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री

इतकी कू्ररता येते कुठून ?
तलवार घेवून व्हिडिओ बनवणे महागात
चर्चा संविधानाच्या करायच्या आणि कृती मात्र मनस्मृतीची – अतुल लोंढे | LOK News 24

नवी दिल्ली : कर्नाटक सरकारचा आज शनिवारी 27 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात 24 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.
सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार व पक्ष नेतृत्वाच्या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यावर सोनिया व राहुल गांधी अंतिम शिक्कामोर्तब केले. गेल्या 20 मे रोजी, सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांच्यासह 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकात डॉ. जी परमेश्‍वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज व एमबी पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तर सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा), रामलिंगा रेड्डी व जमीर अहमद खान यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

COMMENTS