Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीर काळे विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.6 टक्के

Oplus_131072 कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10 च्या परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संक

पारनेर सैनिक बँकेची सभा रद्द करण्याची संचालक मंडळावर नामुष्की
उमेदवारांची निवडणूक खर्चाची केली द्वितीय तपासणी
एस.एस.जी.एम.कॉलेज ‘नॅक’ साठी सज्ज
Oplus_131072

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10 च्या परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला असून यात रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय, करंजी या शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत शेकडा निकाल 95.6 टक्के इतका लागला आहे.
करंजी शाळेतील प्रविष्ट झालेल्या 45 विद्यार्थ्यां पैकी 43 विद्यार्थी पास झाले असून यात प्रथम क्रमांक  लांडबीले श्रुतिका दिनकर (88.60) द्वितीय क्रमांक शिंदे वैष्णवी कैलास (87.20%) तृतीय क्रमांक  गायके भक्ती बाबासाहेब (87%) हे विद्यार्थी यशस्वी झाले आहे तर विशेष प्राविण्यामध्ये 17 विद्यार्थी,प्रथम श्रेणीत मध्ये 18 तर द्वितीय श्रेणी मध्ये 8 विद्यार्थी पास झालेले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, शालेय स्कूल कमिटीचे चेअरमन कारभारी आगवन, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सांडूभाई पठाण, डॉ. सुनिल देसाई, मुख्याध्यापक दिनकर माळी, सर्व शिक्षक तसेच सर्व आजी-माजी विद्यार्थी सेवक वृंद शिक्षण प्रेमी नागरिकांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

COMMENTS