Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीर काळे एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकरावजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब

म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24
अभिनेता करण वाही याला जीवे मारण्याची धमकी ; साधूंविषयी कमेंट पडली महागात | Lok News24
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकरावजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब्लिक स्कूलच्या कार्यालयात सपंन्न झाली. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात येवून सभेस प्रारंभ झाला.
अध्यक्षीय पदाची सूचना अशोक मुरलीधर काळे  यांनी मांडली सदर सूचनेस ज्ञानदेव मांजरे यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे सभासद मच्छिंद्र रोहमारे यांनी दिवंगत झालेले सभासद, मान्यवर, हितचिंतक, कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. विषय पत्रिकेप्रमाणे सभेच्या कामकाजास सुरूवात होवून विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे विश्‍वस्त तसेच कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आ.आशुतोष काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना सांगितले की, संस्थेचा शैक्षणिक उद्देश लक्षात घेता संलग्न शाखांकडुन नफा न कमवता उत्तम प्रकारे ज्ञानदानाचे कार्य करणे हा संस्थेचे संस्थापक स्व. कर्मवीर शंकररावजी काळे याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न अखंडपणे चालु ठेवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या संलग्न शखांच्या नवीन इमारतीचे कामकाज उत्तम प्रकारे चालू असून शासनाच्या येत्या काळात बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करता आपल्या शैक्षणिक संस्थेतही बदल करणे आवश्यक असुन त्याकरिता  संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे हेडक्लर्क केशव दळवी यांनी अहवाल वाचन केले तर विश्‍वस्त कारभारी आगवण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्‍वस्त आमदार आशुतोष काळे, कारभारी आगवण, सचिव चैतालीताई काळे, सिकंदर पटेल, भास्करराव आवारे, बाबासाहेब कोते, उत्तमराव औताडे, राधुजी कोळपे, दिलीपराव चांदगुडे, सुनील बोरा, मधुकर बडवर, रामराव गवळी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, अशोक मुरलीधर काळे, मच्छिंद्र तुकाराम रोहमारे, मच्छिंद्र देशमुख, तसेच गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयुटचे प्राचार्य सुभाष भारती, न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड व काकडीचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, बाळासाहेब गुडघे व सभासद उपस्थित होते.

COMMENTS