Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांन

मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीना कैकाडी समाजाच्या वतीने निवेदन
कामगार आयुक्त कार्यालयासमोर महिलांनी घासली व धुतली भांडी ; क्रांती असंघटित कामगार संघटनेचे आंदोलन
सविता कुंभार यांना श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार प्रदान

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देखील त्यांनी दिला. त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज वटवृक्ष झाला आहे.
          त्यांच्या जयंती निमित्त 22 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, महादजी शिंदे विद्यालय व राजमाता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरितुन भव्य मिरवणूक काढुन शालेय विद्यार्थी यांच्या ढोल व ताशांच्या गजरात जयंती साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे या वर्षीही मिरवणूक रविवार पेठ येथे आल्यावर सदभावना आनंद सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने कर्मवीर अण्णांच्या रथाचे स्वागत करुन सालाबादप्रमाणे यंदाही मुलांना पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले.

COMMENTS