Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतचा वकील 20 हजाराची लाच घेतांना जेरबंद

कर्जत : अपघातातील गुन्ह्याची कागदपत्रे देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भिगवण पोलिस ठाण्यातील प

मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
कोपरगावमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात
 रवी माळवे यांनी केला अंध व मुकबधीरांसोबत वाढदिवस साजरा

कर्जत : अपघातातील गुन्ह्याची कागदपत्रे देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भिगवण पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व कर्जत तालुक्यातील वकीलाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. पुणे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्याच्या समोरच रविवारी दुपारी ही कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे (वय : 53) आणि ड. मधुकर विठ्ठल कोरडे (वय : 35 रा. मिरजगाव, ता. कर्जत) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका 41 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना धडक देणार्‍या वाहनाच्या इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व  ड. मधुकर कोरडे यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली. प्राप्त तक्रारीची एसीबीच्या अधिकार्‍यांनी 15 व 16 ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदार यांना कागदपत्रे देण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे ड. मधुकर कोरडे यांनी 30 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 20 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने रविवारी भिगवण पोलीस स्टेशनसमोर सापळा रचला. दरम्यान, ड. कोरडे यांना पोलीस उपनिरीक्षक लोकरे यांच्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकरे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. दोघांना एसीबीच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आणि भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

COMMENTS