Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने केटीएचएम महाविद्यालयात कारगील. दिनाचे आयोजन 

नाशिकः भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो च्या नाशिक विभागीय कार्यालय  आणि केटीएच एम महाविद्यालयाच्या वतीने आज 26 रोजी

कोपरगाव तालुक्यातील सावकारी रॅकेट उघड
सुखराम यांच्यामुळेच…
केज येथील उपजिल्हा रुग्णालयास फिटल डापलर भेट

नाशिकः भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो च्या नाशिक विभागीय कार्यालय  आणि केटीएच एम महाविद्यालयाच्या वतीने आज 26 रोजी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला केटीचे महाविद्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात कारगिल युद्धात सहभागी झालेले आणि सध्या सैन्य दलातून निवृत्त झालेले ले.कर्नल ब्रह्म सिंह आणि सैन्य दलात कार्यरत अधिकारी कॅप्टन आर्यमान सिंग यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सैन्य दलात सहभागी होऊन देशसेवा करण्यासाठी प्रेरणा दिली कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करू न करण्यात आला यावेळी व्यासपीठावर  महाविद्यालयाचे प्राचार्य आर डी दरेकर केंद्रीय संचार ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी सदाशिव 

मालखेडकर तसेच महाविद्यालयातील मान्यवर शिक्षक उपस्थित होते कारगिल विजय दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरोच्या नाशिक कार्यालयातर्फे केटीएच एम महाविद्यालयामध्ये दिनांक 25 आणि 26 असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे स्पर्धांचे तसेच क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना केंद्रीय संचार ब्युरो चे वरिष्ठ अधिकारी सदाशिव मालखेडकर यांनी सांगितले की भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या जीवनकार्याची तसेच कारगिल युद्धातील जवानांच्या पराक्रमाची विद्यार्थ्यांसह सर्वांना माहिती व्हावी तसेच तिन्ही सैन्य दलातील जवानांना त्यांच्या कामाबद्दल सन्मान दिला  पाहिजे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सध्या सैन्य दलामध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर राजुरी येथे कार्यरत असलेले कॅप्टन आर्यमानसिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थी देशांमध्ये एनसीसी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामात शंभर टक्के योगदान द्यावे एनसीसी मधील प्रशिक्षण हा सैन्य दलाकडे जाण्याचा मार्ग असून एनसीसी कॅडेटनी सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्याव्यात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तसेच सांस्कृतिक दृष्ट्या तुम्ही स्वतःला सक्षम करू शकाल सैन्य दलात अधिकारी म्हणून भरती झाल्यानंतर अशा अधिकाऱ्यांकडून देशाची सुरक्षा सर्वप्रथम त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान सुरक्षा आणि नंतर सर्वात शेवटी स्वतःची सुरक्षा अशी अपेक्षा करण्यात येते. निवृत्त ले कर्नल  ब्रह्म सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध चित्रफितीद्वारे द्रास कारगिल येथील भौगोलिक परिस्थिती तेथे वापरले गेलेले युद्ध तंत्र प्रत्यक्ष लढायचं सहभागी सैन्य दलाच्या जवानांची अधिकाऱ्यांची कामगिरी याविषयी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना लेफ्टनंट कर्नल ब्रह्मसिंह मनाली की कोणताही देश केव्हाच पुढे जातोय ज्यावेळी देशातील युवकांमध्ये देशासाठी समर्पण करण्याची प्रेरणा असते हीच प्रेरणा भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व  लढायांमध्ये दिसून आली आहे वेळोवेळी झालेल्या युद्धात भारतीय वीरांना शत्रू सैन्याला केवळ हरवलेले नाही तर त्यांना चांगला धडा शिकवला आहे सैन्य दलाचा जवान सीमेवर लढत असताना कधी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत नाही सैनिकांच्या पराक्रमाची जाणीव ठेवली तर त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळते त्यामुळे कारगिल विजय दिवस साजरा करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी यामधून प्रेरणा घेऊन आपल्या मधील योद्धाला जागे ठेवावे आणि देशाप्रती आपले योगदान द्यावे असे सांगताना लेफ्टनंट कर्नल ब्रह्म सिंह यांनी कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणारे कॅप्टन विक्रम बत्रा कॅप्टन संजीव जामवाल जवान संजय कुमार यांच्या कामगिरीची ऑडिओ व्हिज्युअल तंत्राद्वारे माहिती दिली कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत स्पर्धेतील तसेच रांगोळी स्पर्धेतील तसेच देशभक्तीपर प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजय त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेतील पुरुष आणि महिला विंग मधील कॅडेट तसेच नेव्हल एन सी सी विंग मधील कॅडेट आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS