Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंजी गावची यात्रा सर्व धर्मीयांचे प्रतीक ः बिपीनदादा कोल्हे

oplus_0 कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील करंजी गावचे ग्रामदैवत असलेल्या चौरंगीनाथ महाराजांचा अक्षय तृतीया या शुभमुहूर्तापासून सुरू होणारा यात्रा

तळागाळातील संघर्षशील योद्धा हरपला ः बिपीनदादा कोल्हे
सहकारी पतसंस्था फेडरेशनला सर्वतोपरी सहकार्य ः बिपीनदादा कोल्हे
योगदिन आणि बिपीनदादा कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
oplus_0

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील करंजी गावचे ग्रामदैवत असलेल्या चौरंगीनाथ महाराजांचा अक्षय तृतीया या शुभमुहूर्तापासून सुरू होणारा यात्रा उत्सव गेल्या 31 वर्षांपासून  मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो या ही वर्षी साजरा होत असलेला चौरंगीनाथ महाराजांचा यात्रा उत्सव म्हणजेच सर्व धर्मीयांच्या वारसाचे प्रतीक असल्याची भावना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सुरू असलेल्या यात्रेस भेटी प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
चौरंगीनाथ यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष भिंगारे, सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक संजय आगवन, देविदास भिंगारे, नवनाथ आगवन, दादाभाऊ भिंगारे, वाल्मिक भिंगारे, अनिल डोखे, गोरख भिंगारे, अंबादास आगवन, अरुण भिंगारे, डॉ. सुनिल देसाई, अजय भिंगारे, विकास शिंदे आदी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीचे अध्यक्ष चंदुनाना भिंगारे, उपाध्यक्ष हर्षल आगवन, सचिव बाबासाहेब आगवन, सहसचिव सतीश फापाळे, प्रसिद्धीप्रमुख आकाश भिंगारे, सह-प्रसिद्धी प्रमुख  महेंद्र शिंदे, खजिनदार योगेश भिंगारे, सह-खजिनदार प्रसाद आगवन, स्वागत कमिटी  गोकुळ जाधव, रवी येवले, ऋषिकेश चरमळ, नियोजन कमिटी  योगेश शिंदे, गणेश भिंगारे, गोविंद आगवन, अण्णा भिंगारे,राजू शेख, आशरफ इनामदार, अल्ताफ शेख, रज्जाक शेख, लक्ष्मण भिंगारे, कृष्णा भिंगारे, गणेश बोठे, भीमराज कासार, जावेद पठाण, दादाभाऊ जोर्वेकर, सुनिल जाधव, सचिन भिंगारे, दिगंबर जाधव, दत्तात्रय आगवन, बाबासो आगवन, रोहित शेळके, नंदकिशोर आगवन, भाऊसाहेब शहाणे, सोमनाथ काकडे, विजय आहेर आदीं कमिटी व्यवस्थापनाने अतिशय नियोजन बद्द रित्या यात्रा उत्सव आयोजित केला. या उत्सवास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी भेट दिली असता ते म्हणाले की, करंजी गावच्या यात्रेला कोपरगाव तालुक्यात अनन्यसाधारण महत्त्व असून हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय या देवाची आपल्या आस्थेचे श्रद्धा स्थान म्हणून मनोभावे पूजा करतात त्यामुळे सर्व धर्मियांचे यांचे प्रतिक असलेल्या या यात्रा उत्सवाचा संदेश संपूर्ण देशभरात जायला हवा अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त करत सर्वांना यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

COMMENTS