Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराडचा सिध्दांत सिंहासने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशात 17 वा

कराड / प्रतिनिधी : अभियांत्रिकी शाखेतील पदवीनंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेश निश्‍चितीसाठी तसेच सरकारद्वारा संचलित कंपन्यांमधील नियुक्तीसाठी देशपातळी

जनतेचे प्रश्‍न समजण्यासाठी जयंतरावांनी स्वतंत्र स्वीय सहायक नेमावा
कराड पालिकेकडून वसुली विभागाचा कारवाईचा धडाका
पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे

कराड / प्रतिनिधी : अभियांत्रिकी शाखेतील पदवीनंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेश निश्‍चितीसाठी तसेच सरकारद्वारा संचलित कंपन्यांमधील नियुक्तीसाठी देशपातळीवर गेट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देशातील विविध सेंटर्समार्फत संगणक प्रणालीद्वारे निगेटिव्ह गुणांकन पध्दतीने घेतली जाते. भारताबरोबरच बांगला देश, नेपाळ, श्रीलंका, इथोपिया व संयुक्त अरब अमिरात येथील विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात. चालू वर्षाच्या या परीक्षेचे आयोजन आयआयटी खरगपुर मार्फत केले होते. ज्ञानाचा कस लागणार्‍या परीक्षेत कराडच्या सिध्दांत सिंहासने याने मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागात देशपातळीवर 17 वा गुणानुक्रमांक मिळवत कराडचे नाव देशपातळीवर झळकविले आहे. गेटची परीक्षा उत्तम गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाल्यामुळे सिध्दांत याला शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या अनेक दर्जेदार संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशातील आयआयटी व त्याचबरोबर परदेशी नामांकित विद्यापीठामध्ये देखील प्रवेशाची दारे खुली झाली आहेत. या परीक्षेची काठिण्यपातळी अतिशय उच्च दर्जाची असते आणि अतिशय कमी विद्यार्थी यश मिळवण्यात यशस्वी होतात. त्यामुळे सिध्दांत याने मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद आहे.
सिध्दांतच्या या नेत्रदीपक यशाबद्दल कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. तसेच त्याच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सिध्दांतचे वडील गिरीश प्रभाकर सिंहासने हे कराड अर्बन बँकेत जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.

COMMENTS