कुणाल कामरा या स्टॅन्डअप कॉमेडियनने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेवर कब्जा केलेले नेते एकनाथ शि

कुणाल कामरा या स्टॅन्डअप कॉमेडियनने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेवर कब्जा केलेले नेते एकनाथ शिंदे, यांच्यावर रचलेले विडंबनात्मक काव्य, कामराला महागात पडले. अर्थात, कामराला यामुळे अडचण आली नसून, ज्या ठिकाणी कार्यक्रम सादर केला, त्या ठिकाणी तोडफोड झाली. दुसरी बाब, कामरा विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्याची मागणी होत असताना, अचानक राज्यात एक बातमी धडकते; तेलंगणा मधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा आणि इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेल्या, सध्या राज्य व्यवस्थेमध्ये समतोल साधत असताना दोन विरोधी बाबींवर गुन्हे दाखल झाल्यानंतरच अटक करण्याची प्रक्रिया सुरू होते; त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या गृहमंत्रालयाला वादाला तोंड द्यावा लागते. प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीला अटक करायची होती, तर ती यापूर्वीच करायला हवी होती. याउलट प्रशांत कोरटकर दुबई येथे फरार झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर, कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्या जाण्याची तयारी झाल्यानंतर प्रशांत कोरडकर ला अटक करण्याच्या बातम्या धरता आहे अर्थात यामध्ये किती वास्तवाने सत्य आहे हे देखील अजून स्पष्ट व्हायचं आहे. परंतु, दखल लिहीत असतानाच परत चर्चा अटकेच्या बातम्या धडकल्या आहेत. आणि तेलंगाना मधून अटक झाल्याची बातमी प्रसारितही झाली आहे अर्थात व्यक्ती जेव्हा व्यवस्थेच्या वर जाऊ पाहतो तेव्हा यंत्रांमध्ये असमतोल होतो आणि नेमकं आदेश कुणाची पाळायचे यासंदर्भातला संभ्रम तयार होतो त्यामुळे राज्याच्या किंवा देशाच्या यंत्रणा ज्या पद्धतीने कार्यरत पूर्वपार लोकशाहीमध्ये आहेत त्यांना त्यांचे स्वायत्त आणि स्वातंत्र्य जर बहाल केलेले राहिले तर निश्चितपणे कोणत्याही कारवाईक दिरंगाई होणार नाही अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या समतोल आणि न्याय प्रशासन व्यवस्थेच्या अनुषंगाने ते ओळखले जातात त्यांच्याशी जवळीकता असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्तावर अन्याय होत नाही हे त्यांना चांगले फायदे परंतु वरवर केलेल्या आरोपांना मात्र ते जराही डगमगत नाही हे देखील त्यांची एक विशिष्टता आहे आणि या विशिष्ट ते मुळेच ते राज्यकर्त्यांना अधिक निडर पद्धतीने कार्यरत राहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये कुणाल कामरा आणि प्रशांत क्रोधकरे यांच्या संदर्भामध्ये सुरू असलेली कारवाई आता नेमकी कोणत्या टोकावर जाऊन थांबेल हे मात्र पहावे लागेल. परंतु कुणाल कामरा आणि प्रशांत परळकर यांच्या संदर्भातील कारवाई ही सध्यातरी चर्चेचा विषय आहे. परंतु एक बाब मात्र निश्चित कुणाल कामरा कॉमेडियन असतानाही त्यांनी राजकीय थीम ही व्यंग करण्यासाठी का निवडली हा एक चर्चेचा विषय खूप आहे अर्थात कुणाल कामरा हा काँग्रेसने सोडलेला कॉमेडीय आहे ,अशी चर्चा जरी सत्ताधारी पक्षातील काही घटक करत असली तरी, कुणाल कामरा अनेक वेळा वादग्रस्त होऊनही ज्या पद्धतीने मोकळा राहिला ते पाहता त्याला नेमकं कोणी उभं केलं हा संभ्रम निर्माण होतो आहे. कारण कुणाल कामराचा कॉमेडियन म्हणून उदय हा 2016 नंतरचा आहे अर्थात केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाच त्याचा कॉमेडियन म्हणून उदय झालेला आहे. त्यामुळे त्याच्यामागे निश्चितपणे कोणत्या शक्ती आहेत हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. कारण, त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरण एक कुठल्याही प्रकारे योग्य होणार नाही ही बाब यंत्रणांनी अधिक समजूतदारपणे लक्षात घ्यायला हवी.
(दखल)
COMMENTS