मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाप्रमाणे राज्य सरकार आता दक्षिण मुंबईतील कामाठीपुर्याचा बीडीडी चाळींच्या धर्तीवरच विकास करण्याचा निर्णय राज्य

मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाप्रमाणे राज्य सरकार आता दक्षिण मुंबईतील कामाठीपुर्याचा बीडीडी चाळींच्या धर्तीवरच विकास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार सुमारे 27 एकर जागेवरील आठ हजार 238 रहिवाशांना 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका मोफत दिल्या जाणार आहेत.
कामाठीपुर्यात 100 वर्षे जुन्या सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये 8238 रहिवासी आहेत. या क्षेत्रात एकूण 349 बिगर उपकरप्राप्त इमारती, 14 धार्मिक स्थळे आहेत. याव्यतिरिक्त म्हाडाने बांधलेल्या एकूण 11 पुनर्रचित इमारती आहेत. या भागातील अरुंद रस्ते, छोटया धोकादायक इमारतींचा विचार करून बीडीडी चाळींप्रमाणेच आमच्या भागाचा विकास करावा आणि बीडीड़ी चाळीतील रहिवाशांप्रमाणे 500 चौरस फुटांची घरे देण्याची मागणी या ठिकाणच्या रहिवाशांनी केली होती. त्याची दखल घेत कामाठीपुर्याचा एकत्रितरीत्या समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामाठीपुर्याच्या समूह पुनर्विकास आराखडयास मान्यता देण्यात आली असून हा प्रकल्प राबविण्यासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकरण म्हणून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. या भागाचा समूह पुनर्विकास करताना भूखंडाच्या मालकांना जमिनीच्या मोबदल्यात प्रचलित शीघ्रगणकानुसार(रेडी रेकनर), जमिनीच्या किमतीच्या 25 टक्क्यांनुसार होणारी रक्कम किंवा विक्रीयुक्त बांधकाम क्षेत्रफळामधून 15 टक्के बांधकाम क्षेत्रफळ यापैकी जे जास्त असेल ते देण्यात येणार आहे. दरानुसार त्यामुळे आजवर गोलपीठा अशी काहीशी बदनामीची ओळख असलेल्या कामाठीपुर्याला येत्या काही वर्षांत नवी ओळख मिळणार आहे.
COMMENTS