पुणे / प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर आम्ही पळ काढत नाही. जे चालले आहे, ते तुम्हीही बघत आहात. मराठा आरक्षणाबाबत जे चालले आहे
पुणे / प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर आम्ही पळ काढत नाही. जे चालले आहे, ते तुम्हीही बघत आहात. मराठा आरक्षणाबाबत जे चालले आहे, त्यात पत्रकारांनी आगीत तेल ओतायचे काम करू नये, असा ठणकावून सांगत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरीत्या पत्रकारांचा रोष ओढवून घेतला.
पुण्यात विविध संस्थांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्कार वितरण सोहळ्यात सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी आपला रोष व्यक्त केला. आगामी निवडणूका आणि उमेदवारी वाटपाच्या हालचालींबद्दल सावंत म्हणाले, मार्च-एप्रिल 2024 मध्ये निवडणूक होणार आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षाची जागा मागण्याचा प्रयत्न करत आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या कोअर कमिटीसह भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ नेते एकत्रित येऊन बैठक घेतील. त्यासंदर्भात चर्चा करतील. सर्वांचे समाधान करणारे त्या-त्या विभागाचे उमेदवारी वाटप हाती घेतले जाईल. सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे. ससून रुग्णालयातील प्रश्नांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले.
COMMENTS